Share

भूकपांनंतर तब्बल 128 तासांनी ढिगाऱ्यातून 2 महिन्यांचे बाळ जिवंत बाहेर; गोबरे गाल अन् निरागस डोळे

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे (Turkey Syria Earthquake) हजारो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. आतापर्यंत 26,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भूकंपामुळे कोसळलेल्या इमारतींचा ढिगारा हटवण्याचे काम अजूनही सुरू आहे. दरम्यान निसर्गाचा चमत्कार बघायला मिळाला.

तुर्कीच्या हाताय प्रांतात एका इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 128 तासांनंतर एक नवजात अर्भक जिवंत सापडले आहे. या मुलाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो बचाव कर्मचाऱ्याच्या मांडीवर बसून त्याचे बोट चोखताना दिसत आहे. यापूर्वी एनडीआरएफ (भारतीय एनडीआरएफ) च्या टीमने तुर्की सैन्याच्या सैनिकांच्या मदतीने गंजियातेप प्रांतातील नुरदगी शहरात मोहिमेअंतर्गत एका २ महिन्याच्या निष्पाप मुलाला वाचवले होते.

त्याचा व्हिडिओ गृह मंत्रालयाने शेअर केला होता, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर स्थानिक लोक तुर्कस्तानमध्ये भारतीय बचाव पथकाच्या कामाचे सतत कौतुक करत होते. गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ गुरुवारी नूरदगी, गाझियानटेपमध्ये शूट करण्यात आला.

व्हिडिओमध्ये, पिवळे हेल्मेट घातलेले एनडीआरएफचे जवान एका २ महिन्याच्या मुलाला ब्लँकेटमध्ये गुंडाळून स्ट्रेचरवर घेऊन जाताना दिसत आहेत. त्या मुलाला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून जवान त्याला अतिशय नाजूकपणे हाताळत आहेत. त्याच्या मानेला सपोर्ट यंत्राद्वारे आधार देण्यात आला असून डॉक्टर त्याची तपासणी करत आहेत.

आग्नेय तुर्की आणि उत्तर सीरियाला झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर सहा दिवसांनंतर लोकांना वाचवण्याचे काम चालू असतानाच, अधिकाऱ्यांनी त्या 130 लोकांना ताब्यात घेतले आहे आणि अटक वॉरंट जारी केले आहे, ज्यांचा भूकंपात नष्ट झालेल्या इमारती निर्माण करण्यात हात होता.

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या 28,000 च्या पुढे गेली आहे, तर किमान 80,000 लोक जखमी झाले आहेत. बचावकार्य अजूनही सुरू आहे. गेल्या पाच दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत अजूनही ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकर्ते अविरत काम करत आहेत.

तुर्कस्तानचे उपाध्यक्ष फुआत ओकटे यांनी शनिवारी उशिरा सांगितले की इमारत कोसळण्यास जबाबदार असल्याचा संशय असलेल्या 131 जणांना अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. तुर्कस्तानच्या न्यायमंत्र्यांनी सांगितले की, इमारती कोसळण्यास जबाबदार असलेल्यांना सोडले जाणार नाही.

सरकारी वकिलांनी बांधकामात वापरल्या जाणार्‍या साहित्याच्या पुराव्यासाठी इमारतीचे नमुने गोळा करण्यास सुरुवात केली आहे. वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी रविवारी गॅझियानटेप प्रांतात दोन लोकांना अटक केली, ज्यांना इमारतीमध्ये अतिरिक्त खोली बनवण्यासाठी खांब तोडल्याचा संशय आहे.

महत्वाच्या बातम्या
मोदी मुस्लिमांना भेटले, त्यांच्यासाठी रोटी बनवली, हे मी केलं असतं तर म्हणले असते हिंदुत्व सोडलं
मुख्यमंत्री शिंदेंना मोठा धक्का? श्रीकांत शिंदेंची उचलबांगडी होणार? भाजपच्या हालचालींनी फुटला घाम
मित्र एमसी स्टॅन विजेता होताच शिव ठाकरेच्या मनातल्या वेदना आल्या बाहेर; म्हणाला, ‘मीच खरा…’

आंतरराष्ट्रीय आरोग्य इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now