नवी मुंबईत बोगस कोरोना रिपोर्ट बनवणाऱ्या दोन लॅबचा पर्दाफाश, आरोपींना अटक

 

कोरोनाच्या संकटात अनेक धक्कादायक घटना पाहायला मिळत आहे. आरोग्य सेवेत अनेक फसवेगिरीचे प्रकार समोर येत आहे. आता असाच एक प्रकार नवी मुंबईत समोर आला आहे.

नवी मुंबईतील एका खाजगी कंपीनीतील १२३ कामगारांचे बोगस कोरोना रिपोर्ट दिल्याप्रकरणी दोन लॅब मालकांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या टेस्टच्या अहवालांवर थायरोकेअर या अधिकृत लॅबचे बनावट लेटरहेड वापरले होते.

रबाळे येथील प्रवीण इंडस्ट्रीजच्या १२३ कामगारांची आरटीपीसीआर टेस्ट करायची होती. त्यासाठी ठाण्यातील मिडटाऊन लॅब आणि कल्याण येथील परफेक्ट हेल्थ पॅथालॉजी यांना बोलावण्यात आले होते. या लॅबचे थायरोकेअर लॅब बरोबर टायअप होते, त्यामुळे या दोन्ही लॅबकडून चाचण्या करण्यात आल्या.

प्रतिचाचणी ६५० रुपये प्रमाणे १२३ कामगारांचे पैसे दोन्ही लॅबला देण्यात आले होते. त्यानंतर या दोन्ही लॅबने १२३ कामगारांच्या कोरोना रिपोर्ट दिल्या, त्या सर्व रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह अशा होत्या. मात्र मिळालेल्या सर्व कोरोना रिपोर्टचा क्युआर कोड सारखाच होता. त्यामुळे संशय आला.

त्यानंतर थायरोकेअर लॅबमध्ये चौकशी केली असता १२३ कामगारांचे सॅम्पल आले नसल्याचे थायरोकेअर लॅबने म्हटले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रवीण इंडस्ट्रीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यामुळे या प्रकरणी बोगस लॅब रिपोर्ट तयार करणाऱ्या महम्मद वसीम शेख, देविदास घुले या दोन आरोपींना रबाळे एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच या दोघांनी किती लोकांना बोगस रिपोर्ट बनवून दिले आहे. याचा तपास सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-

विषय गंभीर तिथं सोनू सूद खंबीर! आता कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवून वाचवले त्यांचे प्राण

ब्रेकिंग! सुपरस्टार अभिनेते विवेक यांचे निधन, सिनेसृष्टीला मोठा धक्का

मुंबई पोलीस आयुक्तांचे जनतेला आवाहन, शक्य झाल्यास पोलीसांना चहा, जेवण द्या

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.