मुंबईच्या ‘या’ गणपतीच्या अंगावर तब्बल २ कोटींचे सुवर्ण अलंकार, राज्यभरात होतेय चर्चा

सध्या प्रत्येकाच्या घराघरात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. अशात काही शहरांमध्ये गल्लोगल्ली सुंदर देखावे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तर भव्यदिव्य देखावे पाहायला मिळत आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी देखावे आहे.

मुंबईचा गणपती हे भव्य देखाव्यांसाठीच ओळखले जातात. तिथे असलेल्या गणपतीच्या उंच मुर्त्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. यासोबतच गणपतीला सुवर्ण दागिनेही घातले जातात.

अशातच सगळीकडे अखिल भटवाडीचा गणपती गर्चेचा विषय ठरला आहे. हा गणपती मुंबईचा सुवर्णराजा म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच भटवाडी विभागातील बर्वेनगर आणि अखिल भटवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ देखील या गणपतीच्या सुवर्ण अलंकार आणि हटके उपक्रमामुळे प्रसिद्ध आहे.

या गणपतीच्या मुर्तीवर तब्बल दोन कोटी रुपये किमतीचे दागिने परिधान करण्यात आले आहे. तसेच या मंडळाने वर्ष भर रक्तदान शिबिर, प्लाझ्मा दान, शैक्षणिक साहित्य वाटप, कोरोना योद्धा सन्मान, मोफत कोरोना प्रतिबंधक लस यासारखे उपक्रम राबवले आहे.

तसेच विभागातील लहान मुलींचे भारतीय टपाल विभागात सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते उघडून त्याचा पहिला हप्ता हे मंडळ भरत आहे. जेणेकरुन त्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या विवाहासाठी मदत होईल.

मुर्तीवर असलेला मुकुट, हातकडे, हात इतरही काही सुवर्ण अलंकार या मुर्तीवर आहे, यांची किंमत तब्बल २ कोटी इतकी आहे. विशेष म्हणजे भटवाडीचा विभाग हा कष्टकरी लोकांचा असला तरी कित्येक वर्षांपासून विभागातील लोक देत असलेल्या वर्गणीमुळे हे तब्बल २ कोटी सुवर्ण अलंकार गणपतीला परीधान करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘…जर झोपलेली जनता जागी झाली, तर मोदी सरकारही कोसळेल’- अण्णा हजारे
ब्रेकींग! मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले,आरक्षण नाही म्हणून…
मराठमोळी अभिनेत्री कविता मेढेकर यांनी शेअर केला मुलीसोबतचा फोटो, फोटो बघून घायाळ व्हाल..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.