१९७१ च्या भारत-पाक युद्धातील भारतीय विजयी रणगाड्यांचा धुराळा येणार रुपेरी पडद्यावर!

विद्या बालनचा पती सिद्धार्थ रॉय कपूर आणि रॉनी स्क्रूवाला रसिक प्रेक्षकांसाठी १९७१ च्या भारत-पाक युद्धामध्ये पराक्रम गाजवणाऱ्या रणगाडा कमांडर ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता ह्यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर घेऊन येत आहे.

ह्या चित्रपटाची धुरा राजा कृष्णा मेनन ह्यांच्या खांदयावर सांभाळण्यास देण्यात आली आहे. राजा कृष्णा मेनन ह्यांनी ह्या आधी अक्षय कुमारचा यशस्वी चित्रपट एअरलिफ्ट हा दिग्दर्शित केलेला आहे. युद्धाभोवती गुरफटणाऱ्या घटनांना रुपेरी पडद्यावर रेखाटण्याचे यशस्वी करामत त्यांनी केली आहे.

१९७१ चे भारत-पाक युद्ध भारताने जिंकले होते. भारताने पाकिस्तानला चारही मुंड्या चीत करीत बांग्लादेशला आजाद केले होते. ९०,००० पाकिस्थानी सैनिकांनी त्यावेळी भारतीय सेनेसमोर अक्षरशा हार पत्करत शरणागती पत्करली होती.

१९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्थानासोबत तिन्ही मोर्च्यांवर लढाई लढली होती. हवेतून , पाण्यावर आणि जमिनीवर ! पाकच्या गाझी ह्या पाणबुडीला बुडण्याचा प्रसंग हा देखील १९७१ चा युद्धातीलच आहे.

त्यावेळी भारताच्या भुज हवाईपट्टीवर झालेला हवाई हल्ला १९७१ च्या युद्धातीलच आहे. आता रसिक प्रेक्षकांसाठी १९७१ च्या युध्दातीलच परंतु ह्यावेळी जमिनीवर संघर्षाची यशोगाथा दाखवली जाणार आहे. ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता ह्यांच्या द बर्निंग चाफेस ह्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट असणार आहे. चित्रपटाचे नाव पिप्पा हे आहे.

१९७१ च्या युद्धा ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता ह्या रणगाड्यामध्ये बसून नेतृत्व करीत होते त्या PT – ७६ च्या रशियन रणगाड्याना पिप्पा असे संबोधले जात. चित्रपटामध्ये बांग्लादेशातील गरीबपूरची लडाई दाखवली जाणार आहे.

शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर हा ह्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि त्याच्या सोबत सुपर थर्टी फेम मृणाल ठाकूर देखील स्क्रीन शेयर करताना आपणास दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या
एक्सप्रेस हायवे नरिमन पाॅइंटपर्यंत न्हेनार; नितीन गडकरी सुसाट
“माजी गृहमंत्री फरार’; हे देशातच नाही तर जगात पहील्यांदा घडतय”
राखीचा काही नेम नाही! आमदाराला म्हणाली, माझे नाव घेतले तर मी तुमचा चड्ढा उतरवेन
‘२०२४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना वर्गणी जमा करण्यापुरती पण राहणार नाही’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.