कोरोना लसीकरणानंतर आरोग्य कर्मचारी बेपत्ता; आरोग्य यंत्रणेची उडाली झोप

मुंबई | भारतातल्या कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण होताच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाकडून २६,२९२ कर्मचाऱ्यांचा डेटा सरकारला पाठविण्यात आला होता.

मात्र चिंतेची बाब म्हणजे आता २४, २६१ आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा समोर आला आहे. यातून १८०० कर्मचाऱ्यांचा माहिती लागत नसल्याचे सांगितले जात आहे. खरच मिळालेली माहिती खरी आहे का? की रेकॉर्डमध्ये काही गोंधळ झालाय याचा शोध सध्या सुरु आहे.

लसीकरण करण्यात आलेल्या सर्व जिल्ह्यांना सरकारने कर्मचाऱ्यांची यादी मागवली होती. सरकारच्या सूचनेनुसार जिल्ह्यातून आलेली यादी शासनाला पाठविण्यात आली होती. त्यात २६,२९२ आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. जेव्हा लसीकरण सुरू झालं तेव्हा १८०० हून अधिक कर्मचाऱ्यांची माहिती मिळाली नाही.

दरम्यान, लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आणि आतापर्यंत २४,२८९ आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती सांगताना डॉ. आरएन सिंह म्हणतात, ‘लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर तब्बल १८०० आरोग्य कर्मचारी कमी असल्याचे समोर आले. आरोग्य कर्मचाऱ्यांची नावे दोन वेळा किंवा अधिक वेळा पोर्टलवर अपलोड झाल्याची शक्यता आहे.’

महत्त्वाच्या बातम्या
भाजप नेत्याची महाविकास आघाडी सरकारवर खरपूस टीका; ‘या सरकारमध्ये फक्त…’
हे आंदोलन थांबवण्यासाठी आता तुम्हीच पुढे या; मोदी सरकारमधील ‘या’ बड्या मंत्र्यांना पवारांचे आवाहन
राज ठाकरेंनी सांगितला शेतकरी आंदोलनावर तोडगा काढायचा मार्ग…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.