कोरोना काळात चोरांचा दिलदारपणा! चिठ्ठी लिहून चोरलेल्या १७०० लसी केल्या परत

जिंद | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. लस, ऑक्सिजन, बेड यांचा मोठा तुटवडा देशात जाणवू लागला आहे. त्यामूळे कोरोना रुग्णांना प्राण गमावावे लागत आहे. रुग्णांचा उपचाराअभावी धक्कादायक तऱ्हेने मृत्यू होत असल्याचं चित्र समोर येत आहे.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे देशात लसींचा काळा बाजार होत असल्याच्या घटना घडत आहेत. सरकारने लसींचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र तरीही घटना कमी होताना दिसत नाहीत.

हरियाणा राज्याच्या जिंद जिल्ह्यात एक चोरीचा अनोखा प्रकार घडला आहे. एका कोरोनावरील सरकारी रूग्णालयात  चोराने तब्बल १७०० कोरोनावरील लसींची चोरी केली होती. मात्र त्यानंतर त्या चोराच्या मनात काय आलं की त्याने पुन्हा चोरलेल्या लसी परत आणून ठेवल्या. या प्रकाराची चर्चा सध्या रंगू लागली आहे.

माहितीनूसार, चोरट्याने रात्रीच्या वेळी कोरोनावरील कोव्हॅक्सीनच्या ४४० लसी आणि कोव्हिशील्डच्या १२७० लसी चोरल्या होत्या. चोरट्यांनी मात्र रुग्णालयातील पैशाला, औषधांना धक्का सुध्दा लावला नव्हता. सकाळच्या सुमारास रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना चोरी झाली असल्याचं लक्षात आलं.

पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी तपासाला सुरूवात केली. त्यानंतर चोरट्याने पोलिस स्टेशच्या जवळील एका चहावाल्याकडे  हे चोरलेले लसींचे डोस गूपचूप  दिले. त्याचबरोबर चोरट्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली. यामध्ये म्हटले की, ‘सॉरी मला माहिती नव्हतं की कोरोनावरील औषध आहे’.

चोरीला गेलेल्या लसी परत मिळाल्या असल्या तरी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, रुग्णालयातील सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. सोशल मिडियावर चोरट्यांनी मागितलेल्या  माफीचा फोटो तुफान व्हायरल झाला आहे.

दरम्यान देशात कोरोनाने रौद्र रुप धारण केले आहे. दि. २२ रोजी ३ लाख ३२ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत १ लाख ८६ हजार ९२० रुग्णांनी जीव गमावला आहे. दिवसेंदिवस आकडेवारी वाढत असल्याने देशात चिंतेची लाट पसरली आहे.
महत्वाच्या बातम्या-
आता लवकरात लवकरे बरे होणार कोरोना रुग्ण; Zydus cadila च्या ‘त्या’ औषधाला मंजूरी
“दोन कानाखाली लावेल”; आईसाठी ऑक्सिजन मागणाऱ्या मुलाला भाजप खासदाराची धमकी
कोरोनाने आई देवाघरी गेली, दु:ख सहन न झाल्याने लेकीने मारली थेट इमारतीवरून उडी; पाहा व्हिडिओ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.