अरे बापरे! १७ वर्षाच्या मुलाला मोबईलचं वेड, २ लाखात बायकोला विकून घेतला महागडा मोबाईल

आजच्या तरुणांना स्मार्टफोनचे इतके व्यसन लागले आहे की ते महागडे स्मार्टफोन घेण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहेत. असे असतानाच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जिथे ओडिशातील एका अल्पवयीन मुलाने आपल्या नवविवाहित पत्नीला २ लाख रुपयांसाठी विकले आहे.

१७ वर्षीय मुलाने एका ५५ वर्षाच्या व्यक्तीला महागड्या स्मार्टफोनसाठी विकले आहे. संबंधित मुलगा हा राजस्थानच्या मध्यमवयीनमधील बोलंगीरचा आहे. त्याने आपल्या पत्नीचा सौदा १ लाख ८० हजार रुपयांमध्ये केला. या मुलाचे अवघ्या २ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. हे गोष्ट पोलिसांना कळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचे नाव किशोर असे आहे. किशोरने प्रथम २४ वर्षीय मुलीशी सोशल मीडियावर मैत्री केली आणि नंतर कुटुंबीयांच्या इच्छेनुसार लग्न केले. लग्नाच्या काही दिवसानंतर मुलगा पैशाबद्दल बोलू लागला आणि नंतर पत्नीसह रायपूरमध्ये कामासाठी घराबाहेर पडला.

रायपूरला गेल्यानंतर अल्पवयीन मुलाने पत्नीचा राजस्थानमधील एका व्यक्तीसोबत १ लाख ८० हजारांमध्ये सौदा केला. पैसे मिळाल्यानंतर त्याने पहिल्यांदा पैशाने एक महागडा स्मार्टफोन विकत घेतला आणि उरलेले पैसे खर्च केल्यानंतर तो ओडिशाला परतला.

जेव्हा तो घरी पोहचला, तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी त्याला पत्नीबद्दल विचारले. त्याने सांगितले की ती इतर पुरुषासोबत पळून गेली होती, परंतु मुलीच्या कुटुंबीयांनी यावर विश्वास ठेवला नाही. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयात हजर केले, तेथून त्याला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, याआधीही एका तरुणीला पैशांसाठी विकल्याची घटना घडली होती. दिल्लीतील हैदरपूर येथील १५ वर्षीय तरुणीची राजस्थानमधील सीकर येथून पोलिसांनी सुटका केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीला उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका व्यक्तीला ६० हजार रुपयांना विकले होते. नंतर तिला राजस्थानला नेण्यात आले. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांना तपासात महत्त्वाचे संकेत मिळाले. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि मुलीची सुटका केली.

महत्वाच्या बातम्या-
गोसावीच्या बॉडीगार्डचे खळबळजनक दावे; शाहरूखकडे मागितले १८ कोटी, त्यातले ८ कोटी वानखेडेंना
धक्कादायक! चला हवा येऊ द्याचं अँकरींग निलेश साबळेकडून हिसकावलं; ही मुलगी करणार अँकरींग
IND VS PAK टी २० सामन्यात भारतच जिंकणार; ‘हे’ आहे सगळ्यात मोठे कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.