आई मरेल हो…, १७ वर्षाचा मुलगा रडत राहिला; पोलिसांनी VIP साठी ऑक्सिजन सिलेंडर हिसकावला; पहा व्हिडिओ

देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजनचा तुडवडा निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक धक्कादायक घटना घडताना दिसत आहे.

रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे मृत्यु झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. असे असताना आता एक माणूसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. कारण उत्तर प्रदेशच्या पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे एका महिलेचा जीव गेला आहे.

आग्र्यात एका रुग्णालयामध्ये १७ वर्षाच्या मुलाची आई उपचार घेत होती. आईच्या उपचारासाठी तरुणाने खुप प्रयत्न करुन एक ऑक्सिजन सिलेंडर मिळवला होता. मात्र पोलिसांनी त्याचा ऑक्सिजन सिलेंडर हिसकावून घेतला आहे.

तो तरुण आईसाठी ऑक्सिजन हवाय मला सिलेंडर द्या अशी विनंती गुडघ्यावर बसून तो करत होता. सिलेंडर नेऊ नका.. आई मरेल हो.. मी तिच्यासाठी ऑक्सिजनची व्यवस्था कशी करु.. अशी विनंती तो करत होता. पण पोलिसांनी एका व्हिआयपी माणसासाठी तो सिलेंडर त्याच्याकडून हिसकावून घेतला आहे

आग्र्यातील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी या पोलिसांच्या कामावर आणि त्यांच्या वर्तवणूकीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. पोलिस संचालक राजीव कृष्णा यांनी या व्हिडिओच्या चौकशीबाबत आदेश दिले आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ आग्र्यातील उपाध्याय रुग्णालयातील आहे. तसेच व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या मुलाचे नाव अं गोयल असे आहे. त्याने मोठ्या मुश्किलिने आईसाठी ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था केली होती, पण एका व्हिआयपी माणसासाठी त्या पोलिसांनी अंशकडून पोलिसांनी सिलेंडर हिसकावून घेतले आहे. त्यानंतर दोनच तासात त्याच्या आईचा मृत्यु झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“सोनिया गांधी मोदींना मौत का सौदागर म्हटल्या ते बरोबर होतं; त्यांना पुढे काय होणार ते दिसलं होतं”
कोरोनाकाळातील ठाकरे सरकारचे काम हे कौतूकास्पद;भाजप खासदाराची ठाकरे सरकारला शाबासकी
स्पर्धेपुर्वी बाप गेला, भर स्पर्धेत फाॅर्मही हरपला; पण अखेर वादळ आलेच; मैदानातूनच बापाला केले नमन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.