धक्कादायक! सापाने दंश केल्यानंतर मुलीला रुग्णालयाऐवजी नेले बाबाकडे, अन्…

मुंबई | देशभरात अनेक ठिकाणी आजही अंधश्रद्धा पाळल्या जात आहे. या अंधश्रद्धा पाळल्याने देशभरात अनेक धक्कादायक गोष्टीही घडत असतात. अशीच एक धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वनकोठे गावात घडली आहे.

वनकोठे गावात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबातील शारदा रामचंद्र भिल असे या युवतीचे नाव असून घर सावरत असताना तिला सर्पा ने शारदाला दंश केला होता. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे, शारदाच्या पालकांनी शारदाला उपचारासाठी दवाखान्यात न नेता अमळनेर तालुक्यातील कान्हेरे फाफोरे येथे एका बाबांच्या ठाण्यावर सर्पाचे विष उतरवण्यासाठी नेले.

शारदावर तेथे  दिवसभर ठेवल्यानंतर काही उपयोग होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांनी तिला परत घरी आणले. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. योग्य उपचारांना उशीर झाल्याने शारदाची शुद्ध हरपली होती. गावातील सुज्ञ नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी शारदाला एरंडोल ग्रामीण रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

दरम्यान, आजही समाजात अंधश्रद्धेला खत पाणी दिल्या जात आहे, हे दुर्दैव म्हणावे लागेल. मात्र या अशा अंधश्रद्धेमुळे आज एका १७ वर्षीय युवतीला आपला जीव गमवावा लागला आहे. याचबरोबर आजही अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारा वर्ग आपल्यात असल्याने या घटना मोठ्या प्रमाणात घडताना पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
दुसऱ्या मुलाला हॉस्पिटलमधून घरी घेऊन गेले सैफ- करिना; पहा बाळाची पहिली झलक
मुलाचा विवाहसोहळा शाही थाटात करणं धनंजय महाडिकांना पडले महागात; वाचा सविस्तर
खासदार डेलकर मृत्यू प्रकरणातला गुंता वाढला! पोस्टमार्टम रिपोर्टमधून झाला धक्कादायक खुलासा…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.