लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलाने केला ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार, पैसेही उकळले

छत्तीसगडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जशपुरच्या बगी क्षेत्रात एका ३५ वर्षीय महिलेने एका १७ वर्षीय मुलावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तसेच पैसे सुद्धा उकळले असल्याचे महिलेने म्हटले आहे.

आता महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तसेच त्या १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेऊन त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बगीच्या पोलिस ठाण्यात ३५ वर्षीय महिलेने एका १७ मुलाविरोधात तक्रार नोंदवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरगुजा जिल्ह्यात राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलासोबत तिची ओळख होती. हे दोघे पण एकमेकांशी फोनवर बोलायचे.

हे दोघे पण एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर महिलेला लग्नाचे आमिष दाखवून मुलाने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच वेळोवेळी पैसेही उकळले. पण त्यानंतर जेव्हा महिला मुलाला लग्नाबद्दल विचारायची तेव्हा तो टाळाटाळ करायचा.

त्यानंतर त्याने महिलेला कायमचे टाळण्यासाठी एक काल्पनिक गोष्ट रचली. जेव्हा त्या महिलेचा पुन्हा फोन आला तेव्हा त्याने सांगितले की मी त्या मुलाचा छोटा भाऊ बोलतो आहे. आपल्या मोठ्या भावाचा मृत्यु झाला आहे, असे त्याने सांगितले.

त्यानंतर एकदिवशी महिलेने तपास केला असता, तो मुलगा जीवंत असल्याचे कळले. त्यानंतर ती महिला त्या मुलाजवळ पोहचली आणि लग्नाचा आग्रह धरु लागली. पण त्या मुलाने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे महिलेने आता पोलिस ठाण्यात धाव घेत त्या मुलावर तक्रारा दाखल केली आहे.

महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले असून या प्रकणाची पोलिस चौकशी करत आहे, अशी माहिती पोलिस ठाण्याचे प्रभारी एसआर भगत यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

काजू , बदाम आणि अक्रोड भिजवून खात असाल तर हा लेख वाचा; आरोग्यास होणारा धोका टळेल…
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची मदत जाहीर
काय सांगता! सहावे लग्न करणाऱ्या माजी मंत्र्याचा भांडाफोड, असे आले प्रकरण समोर, जाणून घ्या…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.