‘मी मरतीय, माझा शोध घेऊ नका’ अशी चिठ्ठी लिहून घराबाहेर पडली सायली; अन् पुढे…

मुंबई | बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोळा वर्षीय मुलीने आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या गोविंदवाडी शिवारात ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सायली कल्याण पारेकर (वय १६) असे या मृत मुलीचे नाव आहे. पहाटे घरातून निघून गेलेल्या सायलीचा मृतदेह बुधवारी (ता. १८) रोजी सकाळी एका विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

तसेच घरातून बाहेर पडताना, सायलीने ‘मी मरतीय, माझा शोध घेऊ नका व कोणालाच जबाबदार धरू नका,’ अशी चिठ्ठी लिहून ठेवली होती.

सायली बेपत्ता असल्याने तिच्या आई-वडिलांनी पोलिसांमध्ये धाव घेऊन सायली बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध घेतला होता. पण, कुठेही तिचा मृतदेह आढळून आला नाही. दरम्यान विहिरीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

दरम्यान, सायलीने हे टोकाचे पाऊल का उचलले? सायलीने आत्महत्या केली की घातपात? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत. अद्याप कारण समजू शकले नाही. मात्र या प्रकरणाचा  तपास गेवराई पोलीस करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
माझी दुखापत गंभीर नव्हतीच, त्यावरून झालेला वाद…;रोहित शर्माचा मोठा खुलासा
विराटला त्याच्या पदावर राहू द्या, आपल्या संस्कृतीत दोन कर्णधार होऊ शकत नाही; कपिलने सुनावले
भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील ‘ही’ अभिनेत्री दिसते अतिशय हॉट आणि ग्लॅमर्स

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.