२४ चेंडू खेळला पण खातं उघडल नाही, अन् सामना संपेपर्यंत एकट्याने चोपल्या तब्बल १५८ धावा

नवी दिल्ली | दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर विजय हजारे ट्रॉफीचा फायनल सामना मुंबई आणि उत्तर प्रदेश संघामध्ये सुरू आहे. या सामन्यात उत्तर प्रदेश संघाचा फलंदाज माधव कौशिक याने जोरदार फलंदाजी करून १५८ धावांची नाबाद तुफान खेळी केली आहे. स्पर्धेच्या फायनलमध्ये १५८ धावांचा विक्रम करून माधव कौशिकने इतिहास रचला आहे.

२३ वर्षीय माधव कौशिकने मुंबई विरूध्द ४ षटकार आणि १५ चौकार मारले आहेत. माधव कौशिकला पहिल्या २३ बॉलमध्ये एकही धाव काढता आली नाही. १० ओव्हरमध्ये उत्तर प्रदेश संघाने अवघ्या २८ धावा काढल्या होत्या. त्यानंतर माधव आणि समर्थ सिंगने तुफान फटकेबाजी करत १२२ धावांची भागीदारी केली.

फलंदाज माधव कौशिकने या सामन्यात उत्कृष्ट खेळी करून अनेक रेकॉर्ड नावावर केले आहेत. त्याच्या करिअरमध्ये त्याने जेवढ्या धावा काढल्या नसतील तेवढ्या त्याने फायनलमध्ये काढल्या आहेत. टीममधील ४ खेळाडूंनी ३१२ रन्स केले आहेत. त्यात माधव कौशिक याचे १५० हून अधिक रन्स आहेत. कौशिकने १५६ चेंडूमध्ये १५८ धावा केल्या आहेत.

विजय हजारे ट्रॉफी २०१४ फायनलमध्ये अहमदाबाद येथे सामना खेळत असताना याआधी मयंक अग्रवाल याने १२५ धावा काढल्या होत्या. त्याचा रेकॉर्ड माधव कौशिकने यावर्षी मोडला आहे.

महत्वाच्या बातम्या-
सचिन वाझे पुरते अडकले, कोर्टाने दिली तब्बल दहा दिवसांची कोठडी
जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दाऊद इब्राहीमला आमिर खानने ‘असा’ दिला होता चकवा
रिषभ पंतने जोफ्रा आर्चरला मारलेला डोळ्याचं पारणं फेडणारा रिव्हर्स स्विपचा षटकार पाहीलात का?
काय म्हणावं या शाॅटला, ही नवी पिढी बिनधास्त; रिषभ तुला तर हॅट्स ऑफ

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.