Share

१५०० कोटींची ऑर्डर! १ लाखाचे झाले १.६९ कोटी, तुमच्याकडे आहे का ‘हा’ शेअर?

सध्या रशिया-युक्रेन वादामुळे शेअर बाजारात(Share Market) प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. या अस्थिरतेमुळे नेमकी गुंतवणूक कुठे करावी? हा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. सध्या शेअर बाजारात महत्वाच्या कंपनीच्या समभागांमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. (1500 crore order! 1 lakh became 1.69 crore)

यामुळे या समभागांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा तोटा झाला आहे. पण शेअर बाजारात नेहमीच असे काही शेअर्स असतात, जे त्यांच्या गुंतवणूकदारांना बक्कळ पैसा मिळवून देत असतात. पण सामान्य गुंतवणूकदारांना या शेअर्सबद्दल जास्त माहिती नसते. असाच एक शेअर Cressanda Solutions कंपनीचा आहे.

Cressanda Solutions ही एका आयटी सेवा पुरवणारी कंपनी आहे. ही कंपनी आयटी, डिजिटल मीडिया आणि आयटी सक्षम सेवा प्रदान करते. या कंपनीचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. या स्मॉलकॅप कंपनीने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. सुरवातीला Cressanda Solutions या कंपनीच्या शेअरची किंमत १९ पैसे इतकी होती.

आज या शेअरची किंमत ३२.१५ रुपये झाली आहे. या कालावधीत हा शेअर ५,३३० टक्क्यांनी वाढला आहे. या कंपनीने गेल्या दोन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल १६,८२१ टक्के रिटर्न दिले आहेत. ६ मे रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत ५१.२ रुपये होती. पण त्यांनतर या किंमतीत सुमारे ३७ टक्कयांनी घट झाली. सध्या या शेअरची किंमत ३२.१५ रुपये आहे.

Cressanda Solutions कंपनीला १५०० कोटींची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीने अनेक मोठ्या कंपन्यांसोबत करार केला आहे. जर एखाद्या गंतवणूकदारने दोन वर्षांपूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक तशीच कायम ठेवली असती तर आज त्या गुंतवणूकदाराला १.६९ कोटी रुपये मिळाले असते.

जर एखाद्या गंतवणूकदारने एका वर्षापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक तशीच कायम ठेवली असती तर आज त्या गुंतवणूकदाराला ५४.५९ लाख रुपये मिळाले असते. Cressanda Solutions कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
फक्त बॉलिवूडच नाही तर साऊथमध्येही होता केकेचा डंका, या ५ गाण्यांनी घातला होता धुमाकूळ
जन्मदात्या वडिलांवरच भर चौकात कोयत्याने केले सपासप वार, कारण वाचून संताप होईल अनावर
मविआतील वाद चव्हाट्यावर, शिवसेनेकडून काँग्रेसची पिळवणूक, वॉर्ड पुर्नरचनेवरून केले गंंभीर आरोप

ताज्या बातम्या आर्थिक

Join WhatsApp

Join Now