लाज सोडली! अंत्यसंस्काराला एकही आला नाही; मात्र दहाव्याला जेवायला १५० जण हजर

अररिया | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.  कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार कठोर निर्बंधांची घोषणा करत आहे.

कोरोनामुळे माणसांमध्ये दरी निर्माण झाली आहे. माणसाचं आयुष्य कोरोनाने हिरावले आहे. कोरोना रुग्ण तडफडून जीव सोडत आहेत. पण कुणीही मदतीला पुढे जात नाही. कोरोनाची भीती लोकांच्या मनामध्ये आहे.

कोरोना महामारीमध्ये अनेक हृदयद्रावक घटना घडल्या आहेत. कोरोनामुळे माणूसकी मेली आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. अशातच बिहारच्या अररिया जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे.

बिशनपुर पंचायतमधील मधुलता गावातील डॉक्टर बीरेन मेहता यांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. यानंतर पत्नी प्रियंका देवी यांचा सुध्दा ४ दिवसांनी कोरोनाने मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झाल्याने प्रियंका देवी यांच्या अंत्यसंस्काराला एकही जण पुढे आला नाही.

आधी वडिलांचा मृत्यू झाला. नंतर आई सोडून गेली. यामुळे मेहता कुटूंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला होता.  यानंतर प्रियंका देवी यांची मुलगी सोनीने एकटीने आईचे अंत्यस्कार केले. सोनीच्या मदतीला एकही जण कोरोनाची लागण होण्याच्या भीतीने आला नाही.

मात्र दहाव्याच्या जेवणाच्या कार्यक्रमाला गावातील १५० पेक्षा जास्त लोक हजर झाली होती. याबाबत एका हिंदी वेबसाईटने वृत्त दिलं आहे. सोशल मिडियावर काही दिवसांपुर्वी पीपीई कीट घालून एक मुलगी  आईच अंतिमसंस्कार करत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता.

सोनी यांचे वडिल डॉ बीरेन मेहता यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पुर्णिया येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वडिलांच्या उपचारासाठी जमीन विकून पैसे जमा केले होते. वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि वडिलांचा मृत्यू झाला.

आई प्रियंका देवीलाही कोरोनाची लागण झाली होती. जवळचे सर्व पैसे संपल्याने सोनीने आईला घरी आणले होते. वडिलांच्या मृत्यूच्या ४ दिवसानंतर आईचही कोरोनाने निधन झाले आहे. बीरेन मेहता यांना सोनी, चांदणी आणि नीतीश कुमार अशी मुलं आहेत.

महत्वाच्या बातम्या-
कविता मिश्रा: इनफोसिसमधील नोकरी सोडून सुरू केली चंदनाची शेती, आता कमावतात लाखो
‘चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपुरे दुसऱ्यांदा चढले होते बोहल्यावर; दुसरी पत्नी आहे खूप सुंदर
धक्कादायक! रुग्णवाहिकेने जास्त पैसे मागितले, बापाने सीटवर बांधून आणला मुलीचा मृतदेह

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.