Share

कौतुकास्पद! शेतकऱ्यांसाठी १५ वर्षीय मुलाने बनवलं एक खास अँप, एका क्लिकवर मिळणार शेतीची माहिती

arvind app

शेतकऱ्यांसाठी तामिळनाडूतील(Tamilnadu) एका १५ वर्षांच्या मुलाने एक अँप तयार केले आहे. या अँपचे नाव ‘गोल्डन क्रॉप’ असं आहे. या अँपच्या मदतीने शेतकऱ्यांना जमिनीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीनुसार पिकांची निवड करता येणार आहे. या अँपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतातली मातीच्या प्रकाराशी सुसंगत असलेल्या पिकांची माहिती मिळणार आहे.(15 years old boy create app for indian farmers)

त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातून चांगले उत्पादन मिळवता येणार आहे. या अँपच्या माध्यमातून शेतकऱ्याला पीक कापणीसाठी लागणाऱ्या दिवसांचा अचूक अंदाज देखील मिळवता येणार आहे. तसेच त्या पिकाचे बाजार मूल्य समजण्यास मदत मिळणार आहे. तमिळनाडूतील तिरुवन्नमलाई येथील अरविंद या १५ वर्षीय मुलाने या अँपची निर्मिती केली आहे.

या अँपच्या मदतीने शेतकऱ्यांना आपल्या शेतातील मातीची चाचणी घेण्यासाठी थेट स्थानिक माती परीक्षण प्रयोगशाळांशी संपर्क साधता येणार आहे. या अँपमधील ‘तुमचे पीक’ हा ऑप्शन वापरून शेतकरी पिकांचा मागोवा घेऊ शकतात. तसेच या ऑप्शनचा वापर करून शेतकऱ्यांना पिकाशी संबंधित पुढील महत्वाच्या बाबींची माहिती देखील मिळू शकते.

या अँपच्या माध्यमातून शेतकरी आपल्या पिकाची तपासणी देखील करू शकतात. अरविंदकडून नियमितपणे हे अँप अपडेट केले जात असते. त्यामुळे शेतकऱ्यांना या अँपच्या सर्व सुविधा व्यवस्थित मिळतात. या अँपमधील इनबिल्ट फीचरद्वारे शेतकऱ्यांना शेतीविषयक तज्ज्ञांकडून अभिप्राय मिळतो. त्यामुळे हे अँप शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

लवकरच हे अँप शेतकऱ्यांसाठी त्यांच्या स्थानिक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. अरविंद हा व्हाईटहॅट ज्युनियरचा विद्यार्थी आहे. या अँपबद्दल माहिती देताना १५ वर्षीय अरविंद म्हणाला की, “शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडवणारी कंपनी तयार करण्याचे माझे नेहमीच स्वप्न होते. मी माझ्या कंपनीचे नाव ‘INBO’ ठेवले आहे.”

“गोल्डन क्रॉप हा माझा छोटासा प्रयत्न आहे. या अँपमुळे आमचे शेतकरी त्यांच्या पिकातून चांगले उत्पन्न मिळवू शकतील आणि चांगले जीवन जगू शकतील”, असे अरविंद म्हणाला आहे. अरविंद सध्या त्याचे ‘गोल्डन क्रॉप’ हे अँप देशभरातील शेतकऱ्यांसाठी कसे उपलब्ध करून देता येईल, यासाठी प्रयत्न करत आहे. त्याला संगणक क्षेत्रात करिअर करायचे आहे.

महत्वाच्या बातम्या :-
लवकरच अंकिता लोखंडेच्या घरीही हालणार पाळणा? लॉकअपमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाली..
भारताच्या ‘या’ भागात सापडली सर्वात मोठी गुहा, आतले दृश्य पाहून लोकं हैराण; शिवलिंगावर…
गुड न्यूज! भारती सिंहच्या घरी चिमुकल्याचे आगमन; सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत म्हणाली..

ताज्या बातम्या शेती

Join WhatsApp

Join Now