Santosh Deshmukh : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली असून, या प्रकरणाने राज्यातील राजकारणात तणाव निर्माण केला आहे. हत्येचे आरोप राजकीय हस्तक्षेपाशी जोडले जात असून, आरोपींनी हत्या कशी केली हे कबूल केले आहे. या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी हत्या केल्याचे स्वीकारले आहे. त्यांनी पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात हत्या कशा प्रकारे केली याची माहिती दिली आहे.
महेश केदारने सांगितले की त्याने स्वतःच्या मोबाईलमध्ये दोन तास देशमुखांवर अमानुषपणे मारहाण करत १५ व्हिडीओ आणि ८ फोटो घेतले. हा सर्व डेटा पोलिसांच्या ताब्यात आला आहे आणि तो न्यायालयात सादर करण्यात आला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हत्येचा घटनाक्रम न्यायालयात सांगितला असून, आरोपींच्या कबुलीजबाबांच्या आधारावर हा प्रकरण तपासला जात आहे.
या हत्येच्या वेळी वापरलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून १९ महत्त्वाचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. फॉरेन्सिक तपासणीत गाड्याच्या काचेवर असलेले ठसे सुधीर सांगळेचे असल्याचे स्पष्ट झाले आहेत. सुदर्शन घुलेच्या गाडीतून आरोपी वाशीपर्यंत गेले होते, आणि त्यानंतर ते जंगलाच्या दिशेने पळले. या गाडीची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये काही महत्त्वाचे फिंगरप्रिंट आणि इतर पुरावे मिळाले आहेत.
संतोष देशमुखांना मारहाण करताना वापरलेली बांबूची काठी जप्त करण्यात आली आहे. आरोपी प्रतीक घुले याने सांगितले की, त्याने संतोष देशमुख यांना मारहाण करताना बांबूच्या काठीचा वापर केला होता. ही काठी गहिर्या जंगलाच्या जवळून जप्त करण्यात आली.
देशमुखांच्या हत्येच्या वेळी महेश केदारने स्वतःच्या मोबाईलमध्ये काढलेल्या १५ व्हिडीओ आणि ८ फोटोमध्ये त्याच्या क्रूरतेचा पुरावा दिसत आहे. व्हिडीओंमध्ये आरोपी संतोष देशमुख यांना पाईप आणि वायरने मारहाण करत आहेत. त्याचप्रमाणे, काही व्हिडीओंमध्ये देशमुखांना शिवीगाळ करत, त्यांना जबरदस्तीने काही विचारले जात आहे.
या प्रकरणातील आरोपींनी दिलेल्या कबुलीवरून हे स्पष्ट झाले आहे की, संतोष देशमुख यांना अमानुष पद्धतीने मारहाण केली गेली आणि हत्येच्या सर्व पुराव्यांचा तपास सुरू आहे.