जवाहरलाल नेहरू (जेएनयू) विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी जेएनयू विद्यापीठात होम-हवन आणि मांसाहाराच्या मुद्द्यावरून दोन विद्यार्थी गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. या घटनेत सुमारे १५ विद्यार्थी(Student) जखमी झाले आहेत. जेएनयू विद्यापीठातील कावेरी वसतिगृहात ही घटना घडली आहे.(15 students injured in clash at JNU University)
या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) जेएनयू विद्यापीठात हवनाचे आयोजन केले होते. याला डाव्या पक्षांच्या विद्यार्थ्यांनी विरोध केला. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने काही विद्यार्थ्यांना मांसाहार करण्यापासून रोखले. या मुद्द्यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या पक्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी जेएनयू विद्यापीठात हिंसेचे वातावरण निर्माण केले आहे, असा आरोप जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन (जेएनयूएसयू) ने केला आहे. पण अभाविपने हा आरोप फेटाळला आहे. रामनवमीला वसतिगृहात पूजा आयोजित करण्यात आली होती. या पूजेला
डाव्या पक्षाच्या विद्यार्थ्यांनी विरोध केला, असा उलट आरोप अभाविपने केला आहे.
यावेळी अभाविप आणि डाव्या पक्षाच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांवर दगडफेक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी अभाविप संघटनेच्या विद्यार्थ्यांनी कावेरी वसतिगृहातील मेसमधील काही विद्यार्थ्यांना मांसाहार करण्यापासून रोखले. यानंतर डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी संघटनेच्या सदस्यांची बैठक बोलावली होती.
अभाविप ‘राइड टू फूड’ या अधिकाराचे उल्लंघन करत आहे, असा आरोप डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी केला होता. त्यानंतर रविवारी रामनवमीच्या निमित्ताने अभाविपच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात हवनचे आयोजन केले होते. यावेळी डाव्या पक्षाच्या विद्यार्थ्यांनी हवनला विरोध केला. त्यावेळी दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली.
या बाचाबाचीचे रूपांतर नंतर तुंबळ हाणामारीत झाले. या हल्ल्यात दोन्ही बाजूचे १५ विद्यार्थी जखमी आहेत. या हाणामारीत समाजशास्त्र विभागाची विद्यार्थिनी अख्तरिस्ता अन्सारी गंभीररित्या जखमी झाली आहे. या प्रकरणात डाव्या विद्यार्थी संघटनांनी आज आंदोलनाची घोषणा केली आहे. दिल्ली पोलीस मुख्यालयासमोर आज डाव्या विद्यार्थी संघटनांकडून निदर्शने केली जाणार आहेत.
पोलिसांनी या प्रकरणात अभाविपच्या अज्ञात विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. आरोपींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेनंतर जवाहरलाल नेहरू (जेएनयू) विद्यापीठात वातावरण तापलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
नाना पाटेकर मोठ्या पडद्यावर करणार कमबॅक, द कन्फेशनमध्ये साकारणार ‘ही’ भूमिका
सलमान खानचे शर्टलेस फोटो पाहून चाहते झाले हैराण, ५६ वर्षांच्या वयातही सिक्स पॅक्स आणि माचो लूक
घाणेरडे काम करताना रंगेहात पकडले गेले होते ‘हे’ बॉलिवूड स्टार्स, बदनामी सहन करत जगताहेत जीवन