कोवीड सेंटरसाठी माझी १४ एकर शेती घ्या पण कोवीड सेंटर उभारा; शेतकऱ्याची आर्त हाक

नांदेड । देशावर कोरोनाचे संकट आले आहे. रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासनावर मोठा ताण आला आहे. यामुळे अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. असाच एक शेतकरी आता मदतीसाठी पुढे आला असून आपली शेती कोविड सेंटरसाठी देण्यास तयार असल्याचे त्याने सांगितले आहे.

रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून जास्तीत जास्त कोविड सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नांदेड शहरापासून १४ किमी अंतरावर स्वप्नील सूर्यवंशी यांची शेती आहे. आपली ही शेती आपण कोविड सेंटरसाठी विना मोबदला देण्यास तयार असल्याचे स्वप्नील यांनी ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे.

यामुळे शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा का म्हटले जाते, याची प्रचिती येते. स्वप्नील हा शेतकरी स्वप्नील हे नांदेश शहर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्षही आहेत. त्यांच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.

देशावर संकट आले असताना अनेकदा शेतकरी पुढे असल्याचे चित्र अनेकदा दिसून आले आहे. सध्या संपूर्ण देश कोरोनाशी दोन हात करत आहे. मात्र आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडला असून रुग्णांना बेड देखील उपलब्ध नाहीत.

ऑक्सिजन, रेमेडीसीवीर इंजेक्शन वैद्यकीय यंत्रणा कमी पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, अद्यापही कोरोनाची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे, राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

परिस्थितीत हाताबाहेर चालली आहे. यामुळे आता कडक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जिल्हाबंदी देखील केली जाऊ शकते. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.

ताज्या बातम्या

भाजप नेते संजय काकडेंना पुणे पोलिसांनी केली अटक; गुंड गजा मारणे रॅली प्रकरण भोवणार 

महाराष्ट्रात आणीबाणी जाहीर करा; चक्क काँग्रेसनेच केली पंतप्रधानांकडे मागणी

एकाच वेळी ५०० लोकांचा गेला असता जीव; पण अखेरच्या क्षणात घडला ‘तो’ चमत्कार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.