नाशिकमधील आरिंगळे मळा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. १३ वर्षाच्या एका शाळकरी मुलीवर बला.त्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून ७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. १३ वर्षाच्या मुलीवर बला.त्काराच्या घटनेमूळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर माहिती अशी की, नाशिक शहरातील सिडको येथील शाळेत पीडित मुलगी शिक्षण घेते. त्याच परिसरातील स्टेडियम समोर राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरूणाने आणि अल्पवयीन मुलांनी पीडितेला चाकुचा धाक दाखवून बला.त्कार केल्याची फिर्याद नाशिकरोड पोलिसांत देण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी तपास करून ७ जणांना ताब्यात घेतले असून त्यात २ अल्पवयीन मुलांसह एका मुलीचा समावेश आहे. आरोपींमधील अल्पवयीन मुले ही पीडितेच्या शाळेत शिकणारी आहेत. या सर्वांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी पीडितेच्या शाळेत जाऊन समुपदेशन केले आहे. या घटनेमूळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महत्तवाच्या बातम्या-
माणुसकीला काळीमा! ओळख न पटवताच अग्निकांडातील बालकांचे ‘ते’ मृतदेह पालकांच्या हवाली
भाजपला धक्का! अजून एक मित्रपक्ष युती तोडण्याच्या तयारीत
पंतप्रधान मोदींच्या विरोधात अपमानकारक ट्विट करणाऱ्या पायलटला कंपनीने शिकवला धडा
रियाचा मित्रांसोबत पार्टीत दंगा, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच सुशांतच्या चाहत्यांना राग अनावर