अजबंच! अवघ्या १३ महिन्यांच्या चिमुकलीच्या पोटात गर्भ; वाचा काय आहे प्रकरण…

झारखंडमधून आश्चर्याचा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. एका १३ महिन्यांच्या मुलीच्या पोटात गर्भ असल्याची दुर्मिळ घटना समोर आली आहे. तिला दवाखान्यात नेण्यात आले होते, त्यानंतर डॉक्टरांनी तपास केला असता हा प्रकार समोर आला आहे.

गिरीडीहमध्ये राहणारी ही मुलगी २ महिन्यांची होती तेव्हापासून तिला पोट फुगण्याची समस्या जाणवत होती. पण पालकांनी तिच्यावर घरी उपचार करण्याचे प्रयत्न केले. पण या उपचारानंतर ही समस्या वाढतच गेली, त्यामुळे तिचे रडणे थांबेनासे झाले.

मुलीच्या पोटाची समस्या वेगळी असेल हे पालकांना जाणवताच ते टाटीसिलवेच्या एका खाजगी रुग्णालयात गेले. तिथल्या डॉक्टरांनी या मुलीची अल्ट्रासाऊंड चाचणी केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मुलीच्या पोटात काहीतरी गडबड आहे.

त्यानंतर डॉक्टरांनी सोनोग्राफी, सीटी स्कॅन आणि एमआरआय या सगळ्या चाचण्या केल्या. तेव्हा मुलीच्या पोटात गर्भ वाढत असल्याचे रिपोर्टमध्ये समोर आले. त्यामुळेच तिचे पोट फुगत चालले होते आणि तिला वेदना होत होत्या.

आता मुलीच्या पोटातून सर्जरी करुन हा २५० ग्रॅमचा गर्भ बाहेर काढण्यात आला आहे. त्यानंतर त्या मुलीच्या पोटातील वेदना थांबल्या आहे. आता तिची प्रकृती चांगली असून तिला घरी सोडण्यात आले आहे, असे डॉक्टर अलोक चंद्र यांनी म्हटले आहे.

या प्रकाराला वैद्यकिय भाषेत फिटस इन फिटू म्हणजेच गर्भाच्या आत आणखी एक गर्भ असे म्हणतात. जगभरात आतापर्यंत अशा फक्त २०० घटना घडल्या आहे, तर भारतात अशा पाच-सहा घटना घडल्या आहे. ५० लाखांमध्ये एका बाळासोबत अशी घटना घडण्याची शक्यता असते, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

धक्कदायक! पुरेशी झोप घेतली नाहीतर तुम्हाला होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार; वाचा सविस्तर
शहाणपणा करायला गेला आणि आजीच्या जाळ्यात फसला, पहा भन्नाट व्हिडीओ
“देशात यापूर्वीही मोठ्या प्रमाणात लसीकरण केले, पण कधी अशी चमकोगिरी केली नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.