आंध्रप्रदेशमध्ये बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर्गातच लग्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या दोघांचा व्हीडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नोव्हेंबरमध्ये ही घटना घडली होती.
आंध्रप्रदेशमधील राजाहमुंद्री शहरात हा प्रकार घडला आहे. व्हीडिओमधील दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन असून शासकीय कनिष्ठ महाविद्यालयातील आहेत. या दोघांनी आपल्याच वर्गात एकमेकांशी लग्न केल्याने पूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
मुलगा मुलीच्या गळ्यात मंगळसूत्रासारखा दोरा बांधतांना दिसत आहे. आणि हा व्हिडिओ मुलीच्या चुलत बहिणीने काढला असल्याची माहिती मिळाली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला कसा याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
चौकशी केल्यानंतर समजले की हे विद्यार्थी महाविद्यालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला विनंती करून वर्गात आले होते. ते शाळा भरायच्या अगोदर लवकर वर्गात आले होते.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊननंतर शाळा सुरू झाल्यानंतर हा सर्व प्रकार घडला आहे. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल कोणी केला याचा तपास सुरू आहे आणि पुन्हा असा प्रकार घडू नये याची दखल घेतली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
तारक मेहता मालिकेतील कलाकाराची आत्मह.त्या; सुसाईड नोटमधून धक्कादायक सत्य बाहेर
‘फुलपाखरू’ मालिकेतील वैदही आठवते का? आज दिसते अशी