भाजपचे १२ ते १५ आमदार संपर्कात, लवकरच राष्ट्रवादीत येणार; खडसेंचा गौप्यस्फोट

मुंबई | भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला राम राम ठोकत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. खडसे यांच्या पक्ष प्रवेशाने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

तर दुसरीकडे खडसे आणि भाजप यांच्यात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरु झालं आहे. खडसेंना राष्ट्रवादीत चॉकलेट मिळतं की, लिमलेटची गोळी? हे आम्हाला पण पाहायचं आहे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मारला होता.

याचाच धागा पकडत स्वतः राष्ट्रवादीचे नेते खडसे यांनीच पाटील यांना जोरदार उत्तर दिलं आहे. याबाबत बोलताना खडसे म्हणतात, ‘चंद्रकांत दादांची मर्यादा चॉकलेट ते कुल्फीपर्यंतच आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर दादांचं नाव महाराष्ट्राला कळावे. एकदाही आमच्या आंदोलनात मी दादांना पाहिलं नाही. त्यांना फार सिरियसली घेऊ नका,’ असे ते म्हणाले.

याचबरोबर भाजपामध्ये मोठ्या संख्येने लोक आलेत. प्रविण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देवून आणलं आहे का?, असा थेट सवाल एकनाथ खडसेंनी चंद्रकांत पाटलांना विचारला आहे.

तसेच पुढे बोलताना खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘१२ ते १५ माजी आमदार माझ्या संपर्कात आहेत, ते लवकरच राष्ट्रवादीत येतील,’ असा दावा खडसे यांनी केला आहे. यामुळे भाजपातील कोणते आमदार खडसे यांच्या संपर्कात आहेत याकडे सर्वांचे लक्ष लावले आहे.

दरम्यान, ‘मी जाणार हे गोपीनाथ गडावरच स्पष्ट झाले असल्याचे खडसे यांनी सांगितले. त्यावेळी मला थांबवण्यासाठी का आग्रह केला नाही? मला थांबवण्यासाठी कुणाचा फोन आला नाही,’ असा खुलासा खडसे यांनी केला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
ट्रकच्या मागे लिहिलेले ‘हे’ खतरनाक ‘ट्रक स्लोगन’ तुमच्यासाठी…
‘माझ्या डोक्यावरच टेन्शन कमी झालं, आता इतरांना टेन्शन देण्याच काम करणार’
कंगनाविरोधात एफआयआर दाखल होताच कंगना चवताळली, म्हणाली…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.