मुंबई | दहावी बारावीची परीक्षा एप्रिल किंवा मे मध्ये होण्याची शक्यता आहे. दहावी आणि बारावीच्या विषयांची यादी खूप मोठी आहे त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेणे अशक्य आहे. त्यामुळे शासन ऑफलाईन परीक्षा घेण्याची तयारी करत आहे.
ही परीक्षा २३ एप्रिलनंतर होण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच बैठक होणार आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता ऑनलाईन परीक्षा अवघड मानली जात आहे. परीक्षेचे वेळापत्रक लवकरच ठरवले जाईल अशी माहिती पुणे बोर्डाच्या अर्चना काळे यांनी दिली आहे.
दरवर्षी ही परीक्षा फेब्रुवारी मार्चमध्ये असते पण कोरोनाच्या महामारीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. २३ नोव्हेंबरपासून ऑनलाईन वर्ग सुरू झाले होते. ऑनलाईन शिक्षण देण्यात आलं पण त्यामुळे विद्यार्थ्यांना एकतर्फी शिक्षण मिळालं.
जे विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाही त्यांच्यासाठी गुगल मिटद्वारे ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. २३ एप्रिलपर्यंत किमान ७० टक्क्यांपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
२५ हजार ८६६ पैकी ९ हजार शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. ५९ लाख २७ हजार ४५६ पैकी सुमारे चार लाखांपर्यंत विद्यार्थी शाळेत येत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने एक ते दीड महिना उशिरा परीक्षा घेण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
पुणेकरांनी शोधलेल्या लसीवर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये’; सुप्रिया सुळेंनी दिला मोदींना इशारा
बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करणारे शेखर सुमन कसे झाले टेलिव्हिजनवरचे कॉमेडी किंग