‘१२ आमदारांचे प्रकरण आणि त्यामागचे राजकारण; दोन्ही केले संजय राऊतांनी स्पष्ट..’

 

मुंबई | सध्या राज्यात राज्य सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील राजकारण चांगलेच रंगले आहे.

कोरोना, लॉकडाऊन आणि १२ आमदार या तीन विषयांवरून राज्य सरकार आणि विरोधी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपण सुरू आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

यावेळी त्यांना १२ आमदार आणि ऑक्टोबरमध्ये सरकार अस्थिर करण्याबाबत लिहलेल्या लेखाबाबत विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर संजय राऊतांनी दिले आहे.

१५ जूनला राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची मुदत संपली आहे. घटना पाळत असू, जी देव आणि धर्मापेक्षा महत्वाची आहे, असे बाळासाहेब ठाकरे सांगायचे.

त्या बाळासाहेब ठाकरे यांचा मी चेला आहे. मला असे वाटते हा देश आणि राज्य घटनेनुसार चालावे. घटनेने जे अधिकार लोकनियुक्त सरकारला दिले आहेत. घटनेने जे अधिकार संसदेला आणि दोन्ही सभागृहांना दिले आहेत. त्या अधिकारांचे हनन होऊ नये.

ते अधिकार पायदळी तुडवू नये. जी परंपरा आहे, ती पुढे चालू रहावी. त्या संदर्भात आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये चर्चा सुरू आहे.

तसेच मला जे वाटत, मला जे दिसत ते मी लिहतो. माध्यमांना असे षडयंत्र दिसत असेल तर समोर आणावे, असे संजय राऊत म्हणाले आहे.

दरम्यान, सरकार अंतर्विरोधाने पडेल असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. यालाही संजय राऊतांनी उत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की, महाविकास आघाडीमध्ये अंतर्विरोध आहे. पण अंतर्विरोध काय अंतरपाटही नाहीये. आम्ही वरमाला घातल्या आहेत, आमच्यात कोणताही अंतरपाट नाही, असा टोला संजय राऊत यांनी फडणवीसांना लगावला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.