बहिणीचं कोरोनाने निधन झाल्यावर भावाचे डोळे फिरले; बहिणीचे १२ लाखाचे दागिने आणि पैसे हडपले

कानपुर | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या टाळूवरच लोणी खाण्याचा प्रकार समोर येत आहे. रुग्णांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांकडून पैशाची लुट करण्यास सुरू आहे.

उत्तर प्रदेशच्या कानपुरमध्येही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. बहिण भावाचं नातं हे सर्वात प्रेमळ, विश्वासाचं नातं असतं. कोरोना झालेल्या बहिणीने आपल्या सख्ख्या भावाकडे दागिने ठेवण्यास दिले होते. मात्र भावाचे डोळे फिरले आणि त्याने बहिणीचे दागिने हडपले.

माहितीनुसार, मुंबईमधील एक महिला २५ एप्रिल रोजी कानपुरच्या कल्यानपुरमध्ये भावाकडे आली होती. यानंतर तिला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. रुग्णालयात तपासणी केली असता तिला कोरोनाची लागण झाली असल्याचं समजलं.

रुग्णालयात  उपचार घेण्यास दाखल व्हायचं असल्याने या महिलेने भावावर विश्वास ठेवून जवळजवळ १२ लाख रुपये किंमतीचे दागिने आणि पैसे भाऊ अजय जवळ दिले. यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना ५ मे रोजी महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला.

महिलेच्या मुलांना आणि कुटूंबाला याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कल्यानपुरला धाव घेतली. महिलेवर अंत्यसंस्कार केल्यानंतर महिलेची मुलगी आरिकाने आईच्या दागिन्यांची आणि पैशाची मागणी मामाकडे केली.

यानंतर मामा अजयचे उत्तर ऐकून आरिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. मामाने थेट दागिने देणार नसल्याचं सांगितलं. आरिकाने मामा अजयकडे कळकळीची विनंती केली तरीही मामाने आपल्या भाचीचं काही ऐकलं नाही.

मामाचे कृत्य पाहून आरिकाला संताप आला. तिने स्वप्नातही विचार केला नसेल की मामा कधी असे करू शकेल. मात्र यावर आरिकाने मामाला धडा शिकवायचं ठरवलं आणि मामा विरोधात कल्यानपुर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

मामा विरोधात तक्रार दाखल करण्यास वाईट वाटत असल्याचं आरिकाने  म्हटलं आहे. आरिका आणि तिचा भाऊ कानपुरच्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यांनी मामाला त्याच्या कृत्याची शिक्षा होत नाही तो पर्यंत इथून जाणार नसल्याचं पवित्रा घेतला आहे.

आरिकाने मामाला पैसे राहू द्या. पण आईची निशाणी असलेले दागिने तरी द्या असं सुध्दा म्हटलं. पण दागिन्यांच्या, पैशाच्या मोहापायी मामा सगळी नाती विसरला आहे. त्याने दागिने देण्यास नकार दिला आहे. महिलेकडे २ लाख रुपये रोख आणि तब्बल १२ लाखांचे दागिने  होते.

महत्वाच्या बातम्या-
भाजून बटाटा खाल्ल्याने होतात ‘हे’ फायदे; वाचा सविस्तर
वा आजी! पुण्यात भाजी विक्री करणाऱ्या आजीने कोरोना रुग्णांसाठी दिले १ लाख रुपये
एकेकाळी भाडे देण्यासाठी खिशात नव्हते पैसे, आज या अलिशान गोष्टी वापरून जगतोय राजा सारखे जीवन…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.