Homeताज्या बातम्या११ वर्षांच्या चिमुकलीने दिला बाळाला जन्म; आईवडिलांसह डॉक्टरांनाही बसला धक्का

११ वर्षांच्या चिमुकलीने दिला बाळाला जन्म; आईवडिलांसह डॉक्टरांनाही बसला धक्का

सध्या ब्रिटनमधून एक हैराण करणारी गोष्ट समोर आली आहे. जी देशात आणि जगात खूप चर्चेत आहे. येथे एका ११ वर्षीय मुलीने बाळाला जन्म दिला आहे. ही मुलगी ब्रिटनची सर्वात तरुण आई बनल्याचे मानले जात आहे. ही घटना ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

एवढ्या लहान वयात आई होणे खरोखरच आश्चर्यकारक आहे. वयाच्या या टप्प्यावर शरीरातील अनेक ग्रंथींचा विकास नीट झालेला नसतो. या दरम्यान मुलांमध्ये अनेक मोठे शारीरिक बदल घडतात. त्यांच्या आत खूप हार्मोनल डेव्हलपमेंट होते, त्यामुळे इतक्या लहान वयात मुलाला जन्म देणं खरंच धक्कादायक आहे.

रिपोर्टनुसार ही मुलगी वयाच्या १० व्या वर्षी गरोदर राहिली होती. सुमारे ३० आठवड्यांच्या गर्भधारणेनंतर, मुलीने मुलाला जन्म दिला. यावेळी आई आणि बाळ दोघेही पूर्णपणे निरोगी आहेत. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, जेव्हा मुलीच्या पालकांना कळले की त्यांची मुलगी इतक्या कमी वयात गर्भवती झाली आहे, तेव्हा त्यांचा विश्वासच बसला नाही.

डॉक्टरांनी याची पुष्टी केल्यावर त्यांनाही धक्काच बसला. या काळात मुलीचे पालक अतिशय संवेदनशील परिस्थितीतून जात आहे. या घटनेवर डॉक्टर कॅरोल कूपर यांनी सांगितले की, त्यांच्या माहितीनुसार ही मुलगी सर्वात लहान आई बनली आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, आई आणि मूल दोघेही पूर्णपणे निरोगी आहेत. दोघेही डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये गेल्या काही काळापासून अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत, जिथे लहान मुली लहान वयातच माता बनत आहेत. या घटनांमुळे तिथले सरकारदेखील चिंतेत आहे.

२००६ मध्ये टेरेसा मिडलटन नावाची १२ वर्षांची मुलगी आई झाली. यानंतर २०१४ मध्ये १२ वर्षांच्या मुलीने मुलाला जन्म दिला. ही दोन्ही प्रकरणे ब्रिटनमधील आहेत. सर्वात लहान आई बनण्याचा विक्रम पेरूच्या लीना मेडिना नावाच्या मुलीच्या नावावर आहे, जी केवळ ५ व्या वर्षी आई बनली होती.

महत्वाच्या बातम्या-
आता नोटीसयुद्ध! विद्या चव्हानांना अब्रूनुकसानीची नोटीस दिल्यावर ठाकरे सरकारकडून फडणवीसांना ‘त्या’ प्रकरणात नोटीस
मुंबईतील सर्वात महागड्या भागात उभा राहणार राकेश झुनझुनवालांचा महाल, किमंत वाचून हैराण व्हाल
उदयनराजे व्हिजन असलेले लीडर आहे, साताऱ्याने त्यांना जपले पाहिजे- नाना पाटेकर