११ वर्षांच्या मुलाने काढला आई-वडिलांचा अश्लील फोटो, युट्युबवर हॅकिंग शिकून मागितली खंडणी

काळ बदलला आणि हळूहळू नवनवीन तंत्रज्ञान बाजारात येत गेले. बऱ्याच गोष्टी आजच्या काळात बदलल्या आहेत. काही वस्तू आपल्या जीवनाला सोपं बनवतात तर काही वस्तू आपल्या जीवनावर भयानक परीणाम करतात.

आधी लोकांना या वस्तूंचे जास्त ज्ञान नव्हते पण आता लहान मुलेही या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काहीही करू लागले आहेत. कोरोना काळात लहान मुलांच्या हातात मोबाईल आले आहेत. त्यांचा सगळा अभ्यास हा ऑनलाइन होत असे.

प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होतो. मुलांच्या हातात जर मोबाईल दिला तर त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. उत्तर प्रदेश गाझियाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ऑनलाइन क्लासेसमुळे पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल दिले आहेत. पण काही लहान मुले याचा गैरवापर करताना दिसत आहेत. गाझियाबादमध्ये राहणाऱ्या एका मुलाच्या हातात मोबाईल देण्यात आला. या कारणामुळे तो एक अपराधी बनला.

या लहान मुलाने युट्युबवर हॅकिंग शिकून स्वतःच्याच आई वडिलांच्या विरोधात एक खूप मोठे षडयंत्र रचले. गाझियाबादमध्ये राहणाऱ्या एका परिवाराने पोलिसांत तक्रार केली होती की त्यांना धमकी असलेला ई मेल आलेला आहे.

यामध्ये त्यांना १० करोडची खंडणी देण्याची मागणी करण्यात आली होती. या ईमेलमध्ये लिहिले होते की आरोपीकडे तुमचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडिओ आहेत. जर तुम्ही १० करोड रुपये दिले नाही तर तुमचे फोटो पूर्ण इंटरनेटवर व्हायरल केले जातील, अशी धमकी देण्यात आली होती.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. जेव्हा सायबर सेलने याची चौकशी केली तेव्हा कळले की जेथून हा मेल आला होता तो आयपी ऍड्रेस त्यांच्याच घरचा होता. जेव्हा त्यांच्या घरची चौकशी करण्यात आली तेव्हा पोलिसांची नजर त्याच घरातील एका ११ वर्षांच्या मुलावर पडली.

जेव्हा त्याला सक्तीने विचारण्यात आले तेव्हा त्याने कबूल केले की हा मेल मीच पाठवला होता. मेल पाठवायच्या आधी त्याने युट्युबवर हॅकिंग कशी करायची याचे धडे घेतले होते. याच्या मदतीने त्याने आपल्या वडिलांचा मेल आयडी हॅक केला आणि पासवर्ड बदलून टाकला.

मग त्याने मेल आयडीवरून अनेक धमकीचे मेसेज पाठवले. पोलीस याचा शोध घेत आहेत की त्या मुलाने असे का केले? मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच ऑनलाइन क्लासमध्ये हॅकिंग हा विषय शिकवण्यात आला होता. दरम्यान, त्याच्याकडे त्याच्या आई-वडिलांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ आहेत का? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

महत्वाच्या बातम्या
नामांतराच्या मुद्यावरून मनसे आक्रमक, शिवसेना नेत्याची गाडी अडवत विचारला जाब
अभिमानास्पद! गवंड्याची मुलगी झाली केंद्रीय पोलिस दलामध्ये भरती, आई-वडीलांचे पाणावले डोळे
मोठी बातमी! नाना पटोले यांनी दिला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
दुबईमध्ये मिळते जगातील सर्वात महाग रॉयल गोल्ड बिर्याणी, किंमत वाचूनच पोट भरून जाईल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.