कोरोनामुळे आईचे दुबईत निधन; ११ महिन्यांचा मुलगा आईच्या अस्थींसोबत परतला मायदेशी

कोरोनाच्या संकटाने भारतातच नाही, तर जगभरात थैमान घातले आहे. कोरोनामुळे रोज हजारो लोकांचा मृत्यु होत आहे. त्यामुळे रोज हजारो कुटुंब होत आहे. अनेक कोरोनामुळे अनेक लहान मुलं अनाथ झाले आहे.

आता अशीच एक हृदयदाव घटना घडली आहे. ११ महिन्यांच्या बाळाला घेऊन काम करण्यासाठी दुबईत गेलेल्या एका भारतीय महिलेचे कोरोनामुळे निधन झाले आहे. काहीदिवस हे बाळं आईच्या मृत्युमुळे तिथेच अडकले होते, पण गुरुवारी या बाळाला परत मायदेशी आणण्यात आले आहे.

हे बाळं गुरुवारी आईच्या अस्थी घेऊन सुखरुप भारतात परतले आहे. त्रिची या आंतराष्ट्रीय विमानतळावर त्या बाळाचे स्वागत करण्यात आले आहे. यावेळी त्या बाळाचे वडिलही उपस्थित होते. बाळाला बघून अनेकांच्या डोळ्यातील अश्रू अनावर आले होते.

ज्या महिलेचा दुबईत कोरोनामुळे मृत्यु झाला, त्या महिलेचे नाव भारती असे असून त्यांचे वयय ३५ वर्षे इतके होते. त्यांना तीन मुले होती. यामध्ये मोठ्या मुलाची किडनी खराब झाल्यामुळे त्याचा मृत्यु झाला होता. पण उपचारादरम्यान दाम्पत्यावर खुप कर्ज झाले होते. त्यामुळे भारती दुबईत नोकरीसाठी गेल्या होत्या.

दुबईत असताना २९ मे रोजी भारती यांना कोरोनाची लागण झाली होती.काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होता, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. जेव्हा भारती यांच्यावर उपचार सुरु होता, तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्या बाळाची काळजी घेतली होती.

आईच्या मृत्युमुळे ११ महिन्यांचे बाळ दुसऱ्या देशात एकटं पडलं होतं. त्यामुळे कुटुंबाची बाळाला आणण्यासाठी धावपळ सुरु होती. ही माहिती तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांना मिळाली. त्यांनी लगेच बाळाला पुन्हा भारतात आणण्याची व्यवस्था केली.

या सर्वांमध्ये दुबईतील डीएमकेचे आयोजन मोहम्मद मारीन यांनी मोलाची भुमिका निभावली. गुरुवारी एंडिगो विमानाने त्या बाळाला आपल्या आईच्या अस्थींसोबत आणण्यात आले. विमानतळावर येताच बाळाच्या वडिलांनी बाळाला ताब्यात घेतलं.

महत्वाच्या बातम्या-

कायदा लागू करताच लव जिहादचे पहिले प्रकरण आले समोर; स्वत:ला ईसाई सांगत फसवले होते तरुणीला
शिखर धवन जिममध्ये घेतोय तुफान मेहनत, ‘म्हणतोय माझा घाम हिऱ्यापेक्षा जास्त चमकतो’
राणे नावाने शिवसेना घाबरते, परत समोर आले तर…! नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.