मुंबई । जमिनीचे व्यवहार करणे ही एक किचकट प्रक्रिया मानली जाते. यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे देखील लागतात. मात्र आता जमीन हस्तांतरण यासाठी फक्त शंभर रुपये लागणार आहेत. कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावरून कुटुंबातीलच दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर जमीन हस्तांतरण करताना बाजारभावानुसार मुद्रांक शुल्क वापरावा लागत होता.
कुटुंबातील रक्ताच्या नात्यामध्ये वडिलांकडून मुलाकडे अथवा वडिलांकडून मुलीकडे जमीन हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क हा भरावा लागत होता तसेच आईकडून मुलाकडे अथवा आईकडून मुलीकडे सुद्धा हस्तांतर करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागत होता.
आता मात्र फक्त 100 रुपयाचे जमीन हस्तांतरणाचे वाटणीपत्र आता करता येणार आहे त्यासाठी शासनाकडून या आधी एक परिपत्रक काढण्यात आले होते. यामध्ये आता मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत.
वाटणीपत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी वर्गात संभ्रमावस्था निर्माण झाली होती. याचा फटका बहुतांशी सर्वसामान्य शेतकर्यांना बसत होता त्यामुळे वडिलांची अथवा आईची जमीन मुलाच्या अथवा मुलीच्या नावावर करण्यासाठी ही मुद्रांक शुल्क भरावा लागत होता. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत होता.
महाराष्ट्र शासनातर्फे आदेश काढण्यात आले असून हिंदू कुटुंब पद्धतीनुसार वडिलांचे अथवा आईची जमीन त्यांच्या मुलांमध्ये वाटणीपत्र करत असताना महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 नुसार तहसिलदारांना अधिकार आहेत. अधिकाराचा वापर करून शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर हे अधिकृत वाटणी पत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यास कसलीही हरकत नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
त्यामुळे महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 85 नुसार येणारी कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील जमीन हस्तांतरणाची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत अशा सूचना शासनातर्फे महाराष्ट्रातील तहसीलदारांना दिलेल्या आहेत. केवळ शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर रक्ताच्या नात्यात जमीन विभाजन होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
साताऱ्याच्या ‘या’ पठ्ठ्याची मुकेश अंबानी यांना टक्कर; कारनामा बघून तुम्ही पण हैराण व्हाल
‘राज्यात पोपट मरतात, कावळे मरतात फक्त महाविकास आघाडी सुरक्षित’
विराट की अनुष्का; कुणासारखी दिसते ‘विरुष्का’ची लेक? पहा पहिलावहिला सुपरक्यूट फोटो
भारतात चालू वर्षात ‘या’ क्षेत्रातील नोकऱ्यांना असेल जास्त मागणी, वाचा सविस्तर