किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा दावा ठोकणार; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे हसन मुश्रीफ संतापले

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यांनी आपल्याकडे राज्य सरकारच्या ११ मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचे सांगितले आहे. असे असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले आहेत. यामुळे आता मुश्रीफ यांनी देखील त्यांना उत्तर दिले आहे.

हसन मुश्रीफ म्हणाले, मी आतापर्यंत ५०-५० कोटींचे अब्रुनुकसानीचे सहा दावे दाखल केले आहेत. आता सातवा दावा दाखल करणार आहे. माझ्या कुटुंबाची आणि माझी बदनामी झाली. गेल्या १७ वर्षांपासून मी राजकारणात आहेत. माझ्यावर कोणी आरोप केला नाही.

तसेच भाजपसारखे घोटाळे आम्ही केले नाही. येत्या दोन आठवड्यात फौजदारी अब्रुनुकसानीची १०० कोटींचा दावा कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात करतोय, सोमय्यांनी १२७ कोटी घोटाळ्याचा आरोप केला. मनापासून तिव्र निषेध करतो, असेही ते म्हणाले.

त्यांनी भाजपची प्रतिमा मलीन होईल, असे वक्तव्य किरीट सोमय्यांनी करू नये, अनेकदा माझ्या घरावर धाड टाकली होती. सर्व निवासस्थानावर धाड टाकली. त्यात काहीच आढळले नाही. कारखान्यामध्ये त्यांना काही संशय होता. ते प्रकरण आता न्याप्रविष्ट आहे. त्याबाबत मी सर्व उत्तरे दिलेली आहेत. कदाचित सोमय्यांना काही माहिती नसावे, असेही ते म्हणाले.

त्यांनी जे कागदपत्रे दाखविली ते सर्व संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. निवडणुकीमध्ये कागदपत्रे आपण दाखल करतो ते उपलब्ध असतात. विशेष यांनी असे काही केले नाही. असेही ते म्हणाले. यामुळे आता सोमय्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.