अजित पवारांनी दिले राज्यात १० हजार जागांसाठी पोलीस भरती करण्याचे निर्देश

 

मुंबई | राज्यातील पोलीस दलावरील ताण कमी करण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था भक्कम करण्यासाठी पोलीस शिपाई या संवर्गातील १० हजार पदे भरण्यात येतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची नागपुर मधील काटोल येथे स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्वाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गृह विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

बैठकीत गृह विभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या आठ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव आला. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी दोन हजार जागा वाढवून दहा हजार पोलीस शिपाई भरती करण्याचे निर्देश दिले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.