अबब! आमदाराच्या ड्रायव्हरकडे सापडले एक कोटी, इनकम टॅक्सच्या छापेमारीत भांडे फुटले

एका आमदाराच्या ड्रायव्हरच्या घरात एक कोटी रूपये सापडल्याने खळबळ माजली आहे. इन्कम टॅक्सच्या छापेमारीत हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. इन्कम टॅक्सने ही रक्कम जप्त केली आहे. अण्णाद्रमुकचे आमदार के. चंद्रशेखर या आमदाराच्या ड्रायव्हरकडे ही भलीमोठी रक्कम सापडली आहे.

आयकर विभागाने त्याच्यावर कारवाई केली आहे. त्या ड्रायव्हरचे नाव अलगरासामी असून त्याचे वय ३८ वर्षे आहे. एवढी मोठी रक्कम त्याच्याकडे आली कशी? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. चंद्रशेखर हे तामिळनाडूच्या त्रिची जिल्ह्यातील मनाप्पराई मतदार संघाचे आमदार आहेत.

गेली १० वर्षे झाली हा ड्रायव्हर त्यांच्यासाठी काम करत आहे. आता तिसऱ्यांदा त्यांची AIADMK चा उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. चंद्रशेखर यांचे अन्य दोन साथिदार वालासुपत्ती येथील थंगपंडी आणि कोट्टाइपट्टी मधील आनंद यांच्या घरावर देखील छापेमारी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चंद्रशेखर यांच्या घराजवळ असणाऱ्या निवास्थानाजवळ ही छापेमारी करण्यात आली होती. या एक कोटी रूपयांचा त्यांच्याकडे कसलाही रेकॉर्ड किंवा कागदपत्रे नाहीत. सगळ्या ५०० रूपयांच्या नोटा यामध्ये होत्या. त्यामध्ये २० हजार ५०० रूपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

त्रिची इन्कम टॅक्स को-डायरेक्टर मदन कुमार यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन पार पडले. तीन पथकांनी या तिन्ही साथिदारांच्या घरी छापेमारी केली होती. इन्कम टॅक्सकडे अशी माहिती आली होती मतदारांना पैसैवाटप केली जात आहे. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या
नरेंद्र मोदींनी शरद पवारांना फोन करून तब्येतीची विचारपूस केल्याने राजकीय चर्चांना उधाण
अजितदादांचे कट्टर राजकीय शत्रू हर्षवर्धन पाटलांच्या भेटीला गेले पार्थ पवार; राजकीय भूकंपाचे संकेत…
एकेकाळी ८०० रुपयांवर काम करणारे जॅक मा, कसे बनले चीनचे दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.