मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी; “४ दिवस शिल्लक आहेत,जे करायचे आहे ते करा”

उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सतत कोणत्या न कोणत्या कारणाने प्रसिद्धीत असतात. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा मेसेज उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपत्कालीन सेवा डायल क्रमांकावर आला आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांचा आपत्कालीन क्रमांक असणाऱ्या ११२ या व्हाट्स अँप क्रमांकावर मेसेज पाठवून ही धमकी देण्यात आली आहे.
धमकीचा हा मेसेज योगी आदित्यनाथ यांना पहिल्यांदाच आलेला नाही.याआधी पण त्यांना धमकीचे मेसेज आले होते.

यावेळी परत धमकीचा मेसेज आल्यामुळे पोलीस जास्त सतर्क झाले आहेत. या मेसेज संदर्भात पोलिसांनी सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून त्या व्हाट्स अँप नंबरची चौकशी करून पोलीस पुढील तपास करत आहेत.

योगी आदित्यनाथ यांना २९ एप्रिल रोजी संध्याकाळी उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपत्कालीन सेवा डायल ११२ या क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने मेसेज केला.त्या मेसेजमध्ये त्याने योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. “मुख्यमंत्र्यांजवळ ४ दिवस शिल्लक आहेत,त्यामुळे या चार दिवसात माझे काय करायचे आहे ते करा. ५ व्या दिवशी योगी आदिनाथ यांना ठार करेल” असे या धमकीच्या मेसेजमध्ये म्हटले आहे.

आरोपीने धमकी दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची वेगाने फिरवली आहेत. धमकी देण्यात येणाऱ्या क्रमांकाची चौकशी करण्यासाठी सर्व्हिलन्स टीम तैनात करण्यात आली आहे. याबरोबर आरोपीला पकडण्यासाठी टीम तैनात करण्यात आल्या असून सर्व्हिलन्स टीम त्यांना मदत करणार आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यापूर्वी पण धमक्या देण्यात आल्या आहेत. मागच्या वर्षी मे, सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यात योगी आदित्यनाथ यांना धमकी देण्यात आली होती. या गुन्ह्यात महाराष्ट्रातून एका आरोपीला अटक करण्यात आली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.