महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळकेंनी घेतली चांगली मत;पण पाहावे लागले पराभवाचे तोंड

कर्नाटक राज्यातील बेळगाव लोकसभा निवडणुकीचा निकाल रविवार दिनांक २ मे रोजी लागला. बेळगाव लोकसभा निवडणुकीची पोटनिवडणुकचा सामना अटीतटीचा झाला.लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अंगल मंगडी यांनी काँग्रेस पक्षाच्या सतीश जरकीहोळी यांचा खूप कमी मतांनी पराभव केला.

भाजपच्या उमेदवारांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा ५ हजार २४० मतांनी पराभव केला आहे.या दोन उमेदवारांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळके याने चांगली लढत दिली.भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारानंतर शुभम शेळके तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी चांगली मते घेतली.त्यांनी जवळपास १ लाख १७ हजार मते मिळवली आहेत.मराठी भाषिकांचे प्रमाण उत्तर दक्षिण आणि बेळगाव ग्रामीण मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहे.मराठी भाषिकांनी शुभम शेळके यांच्या पदरात भरभरून मते टाकली.

शेळके यांनी भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या मतदार संघात पण चांगली मते घेतली.शुभम शेळके यांनी दक्षिण बेळगाव मतदार संघातून ४४ हजार ९५०,बेळगाव उत्तर २४ हजार ५९४ आणि बेळगाव ग्रामीण मतदार संघातून ४५ हजार ५३६ मते मिळवून राष्ट्रीय पक्षांना घाम फोडला आहे.

बेळगाव मतदार संघातून झालेली लोकसभा पोटनिवडणुक खूपच चुरशीची झाली. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारानी चांगली टक्कर झाली. शिवसेना पक्षाने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठींबा दिला होता.

शिवसेना पक्षाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला पाठींबा दिला.त्यामुळे समितीच्या उमेदवाराचे पण मनोबल मोठ्या प्रमाणावर वाढले.शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रचाराला उपस्थित राहून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराचे मनोबल वाढवले होते.संजय राऊत यांनी प्रचार केल्यामुळे निवडणुकीत रंगत भरली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.