Mulukh Maidan
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

पाकिस्तानला हरवून जेमिमाने विराट स्टाईल जल्लोश करताच खेळाडूंनी धावत मारली मिठी; भारताचा सेलिब्रेशन व्हिडिओ व्हायरल

Tushar Dukare by Tushar Dukare
February 12, 2023
in ताज्या बातम्या, खेळ
0

INDW vs PAKW: T20 विश्वचषक 2023 च्या पहिल्याच सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानला पायदळी तुडवून गेल्या वर्षीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. जेव्हा पुरुष संघानेही T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघावर थरारक सामन्यात विजय नोंदवला होता.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाक संघाने भारताला 150 धावांचे लक्ष्य दिले होते, त्याला प्रत्युत्तरात जेमिमा रॉड्रिग्ज आणि ऋचा घोष यांच्या जलद खेळीमुळे टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाची सुरुवात काही खास झाली नाही.

या दोन्ही सामन्यांमध्ये अनेक समान गोष्टी पाहायला मिळाल्या. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे भारताच्या कर्णधारांनी दोन्ही विजयांमध्ये सारखेच सेलिब्रेशन केले. खरे तर १२ फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्सने विराट कोहलीच्या मेलबर्नमधील विजयाप्रमाणेच सेलिब्रेशन केले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

#INDWvsPAKW india women's celebration 🎊 pic.twitter.com/irXQak4dJX

— Shilpi Sharma (@ShilpiS22339806) February 12, 2023

पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात विराट कोहलीप्रमाणेच जेम्मा रॉड्रिग्सनेही कठीण परिस्थितीत अर्धशतक ठोकून भारताला विजय मिळवून दिला आहे. शेवटी चौकार मारून त्याने भारताला विजय मिळवून दिला, हे दृश्य अगदी 2022 साली झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यासारखे होते.

जेव्हा रविचंद्रन अश्विननेही शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला. त्यावेळी विराटही हवेत हात उंचावून खेळपट्टीवर धावताना दिसला. तसेच आता जेमिमानेही केले आहे. त्यानंतर त्यांच्या या सेलिब्रेशन व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाची सुरुवात काही खास झाली नाही. अवघ्या 7 षटकांत पाकिस्तानने 3 फलंदाज गमावले होते. यानंतर कर्णधार बिस्माह मारूफ आणि आयशा नसीम यांनी 81 धावांची भागीदारी करून भारतीय गोलंदाजांना रोखले. त्यामुळे पाक संघ 149 धावा करू शकला.

दीडशे धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला नव्या सलामीच्या जोडीसह चांगली भागीदारी हवी होती. कारण या सामन्यात नियमित सलामीवीर स्मृती मानधना दुखापतीमुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होऊ शकली नाही. अशा परिस्थितीत यास्तिका भाटिया आणि शेफाली वर्मा यांनी डावाला सुरुवात केली.

भारताने भाटियाला 38 धावांवर गमावले. त्यानंतर शेफालीही 27 धावा करताच माघारी परतली. शेफाली वर्मानंतर लक्ष्य गाठण्याची जबाबदारी कॅप्टन हरमनसह जेमिमाच्या खांद्यावर आली. दोन्ही खेळाडूंमध्ये 28 धावांची भागीदारी झाली.

नंतर कर्णधार हरमनने संयम गमावून मोठा फटका खेळण्याच्या नादात आपली विकेट गमावली. पण जेमिमा रॉड्रिग्ज शेवटपर्यंत नाबाद राहिली आणि तिने 53 धावा केल्या, तिला साथ देताना ऋचानेही 31 धावांची खेळी खेळून भारताच्या विजयात आपले अमूल्य योगदान दिले.

महत्वाच्या बातम्या
मंत्रिपद मिळताच संदीपान भुमरेंनी टाकली ९ दारुची दुकाने अन्; अजित पवारांचा गौप्यस्फोट
मृत्यूला चकवा देऊन अक्षरश मरणाच्या दाढेतून परत आले गौतमी अदानी; वाचा थरारक किस्सा
“चादर चढवणे आणि मेणबत्ती लावणे श्रद्धा, पण नवसाचा नारळ फोडणे मात्र अंधश्रद्धा” कुठून येतो हा दुटप्पीपणा?

Previous Post

श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानच्या जबड्यातून हिसकावला विजयाचा घास; वर्ल्डकपची विजयी सुरवात

Next Post

राष्ट्रवादीला भलेमोठे खिंडार! शरद पवारांच्या सर्वात विश्वासू नेत्यावर भाजपचे जाळे

Next Post
devendra fadanvis sharad pawar

राष्ट्रवादीला भलेमोठे खिंडार! शरद पवारांच्या सर्वात विश्वासू नेत्यावर भाजपचे जाळे

ताज्या बातम्या

BCCI चा पाकिस्तानला दणका! आशिया कपचे यजमानपद घेतले हिसकावून; आता ‘या’ देशात होणार स्पर्धा

March 30, 2023
imtiyaz jaleel

तुफान दगडफेक, वाहनांची जाळपोळ.. बेभान जमावात घुसले जलील अन् वाचवले राममंदीर; वाचा नेमकं काय घडलं..

March 30, 2023
modi-rahul-gandhi

कर्नाटकात भाजप आणि काँग्रेस दोघांनाही मोठा झटका, या सर्वेक्षणामुळे दोन्ही पक्षांची उडेल झोप, पहा आकडेवारी

March 30, 2023

‘नारायण राणेंच्या कानावर बंदूक ठेवली अन् विचारलं की…’ मुख्यमंत्र्यांनी सांगीतला ED, CBI चा थरारक किस्सा

March 30, 2023
Uddhav Thackeray Sad

ठाकरे गटातील आणखी २ खासदार शिंदेगटात जाणार; मोदींच्या जवळच्या मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट

March 30, 2023
gopichand padalkar

“देशासाठी प्राण हातावर घेऊन लढनारे आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली किड आहोत का?” पडळकर तुम्हाला माफी नाही

March 30, 2023
  • Home
  • Privacy Policy
  • प्रसिद्ध अभिनेत्रीला आला कार्डीअक अरेस्ट, गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल, आता व्हेंटीलेटरवर..

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

WhatsApp Group