टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू बनला आमदार; पहिल्यांदाच खेळणार राजकीय खेळपट्टीवर

पश्चिम बंगाल राज्यासोबतच ४ राज्यांचे विधानसभा निवडणुकांचे निकाल पण रविवार दिनांक २ मेला लागले. पश्चिम बंगाल राज्यात तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे परत सरकार बहुमताने निवडून आले.

पश्चिम बंगाल राज्यातून मनोज तिवारीने तृणमूल काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मनोज तिवारी भारतीय संघाचा माजी खेळाडू असून त्याने कोलकत्ता नाईट रायडर्स संघाकडून आयपीएलमध्ये चांगली कामगिरी पण केलेली आहे. मनोज तिवारीने राजकीय कारकिर्दीतील पहिलीच निवडणूक तृणमूल काँग्रेस पक्षाकडून लढवली.

रविवारी मतमोजणी झाली तेव्हा त्याचा बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय झाला. मनोज तिवारीने ग्रेटर कोलकाताच्या शिबपूर मतदार संघातून अर्ज भरला होता.त्याने तृणमुल काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर अर्ज भरला होता.

शिबपूर मतदार संघातून त्याने भारतीय जनता पक्षाच्या रथिन चक्रवर्ती यांचा ३२ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव करून आमदार होण्याचा मान मिळवला. मनोज तिवारी भारतीय संघाकडून क्रिकेट खेळत असे. त्याने भारतीय संघाकडून १२ एकदिवसीय सामने आणि ३ टी २० सामने खेळलेले आहेत.

त्याने एकदिवसीय सामन्यात एक शतक आणि एक अर्धशतक केले आहे. त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत २६.०९ च्या सरासरीने २८७ धावा केल्या आहेत.मनोज तिवारी आयपीएल स्पर्धेचा पण भाग राहिलेला आहे.

मनोज तिवारीने आयपीएल सामन्यांमध्ये १,६९५ धावा केलेल्या असून त्याच्या धावांची सरासरी ९८.७२ होती.त्याने आयपीएलमध्ये ९८ सामने खेळलेले आहेत. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये ७ अर्धशतके आहेत. तो कोलकत्ता नाईट रायडर्स, पुणे सुपरजायंट आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघांकडून खेळलेला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.