कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेचे वाजले बारा; वृद्धावर सायकलवरून मृतदेह नेण्याची आली वेळ

कोरोना रुग्णांची संख्या देशभरात रोजच वाढताना दिसत आहे. रुग्णांना प्राथमिक सुविधांचा अभाव असतानाच आता आरोग्य सुविधा पण अपुऱ्या प्रमाणात मिळताना दिसून येत आहेत. दररोज कुठून न कुठून वाईट बातम्या कानावर येत आहेत. आता अशीच एक बातमी उत्तर प्रदेश मधील जैनपूर जिल्ह्यातून समोर आली आहे.

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्या फोटोमध्ये वृद्ध माणूस महिलेचा मृतदेह सायकलवरून नेताना दिसत आहे.तर दुसऱ्या फोटोत पाहिलेचा मृतदेह सायकलवरून खाली पडला आहे. ज्यामुळे सायकलपासून काही अंतरावर वृद्ध माणूस कपाळाला हात लावून बसला आहे.

त्या वृद्ध माणसाचे नाव टिळकधारी असून त्याच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन झाले आहे.त्याच्या पत्नीचा मृतदेह रुग्णवाहिकेने गावात आणला असता गावकऱ्यांनी अंत्यविधी करायला नकार दिला.गावकऱ्यांनी नकार दिल्यामुळे टिळकधारी नाईलाजाने सायकलवर मृतदेह घेऊन अंत्यविधीला एकटेच निघाले.

टिळकधारी हे वाटेत जात असतानाच त्यांच्या सायकलवरून मृतदेहाचा तोल गेला आणि तो खाली पडला.मृतदेहासोबतच सायकलचा पण तोल गेल्यामुळे सायकल पण पडली. टिळकधारी यांना अशा अवस्थेत तिथून जाणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने पहिले.

त्याने पोलीस कर्मचाऱ्याने पाहिल्यावर त्याने विभागातील सीओला ही घटना कळवली आणि मग त्यांनी अंत्यविधीची व्यवस्था केली.त्यानंतर मुस्लिम तरुणांच्या मदतीने त्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार पण करता येत नसल्याच्या दुःखद घटना घडताना दिसून येत आहेत.

अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधूनच पुढे आली होती. त्या घटनेत एक महिला तिच्या पतीला तोंडाने ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.त्या महिलेकडे तिच्या पतीचा कोविड पॉझिटिव्हचा रिपोर्ट नसल्यामुळे रुग्णालयाने तिच्या पतीला दाखल करून घ्यायला नकार दिला होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.